दोन्ही भाऊ अटकेत, २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी
जळगाव (विशेष प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील कानसवाडा शिवारात शुक्रवारी सकाळी झालेल्या युवराज कोळी यांच्या खून प्रकरणात एलसीबीच्या पथकाने संशयित देवेंद्र उर्फ देवा पाटील याला अटक केली आहे. तर नशिराबाद पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी मुख्य संशयित परेश उर्फ सोनू भरत पाटील याला अटक केली आहे. तर दोघांचा पिता भरत पाटील याचा शोध सुरु आहे.
२०२१ साली कोविड काळात घडलेल्या घटनेचे पडसाद ४ वर्षांनी शुक्रवारी उमटले. त्याचे पर्यवसान थेट खून प्रकरणातच झाल्याचे फिर्यादीतून दिसून आले आहे. दरम्यान, संतप्त जमावाने संशयित आरोपींची घटनास्थळावरील दुचाकी व शेळगाव येथील हॉटेल पेटवून देत जाळपोळ केली होती. या घटनेत सुरुवातीला देवेंद्र उर्फ देवा भरत पाटील याला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.(केसीएन)तर नशिराबाद पोलीस स्टेशनचे एपीआय आसाराम मनोरे यांना मिळाल्या माहितीवरून पीएसआय रवींद्र तायडे, पोहेका शरद भालेराव, प्रशांत विरनारे, पोका रुपेश साळवे व सागर बिडे अशांनी रात्री उशिरा खुनातील दुसरा संशयित आरोपी परेश उर्फ सोनू भरत पाटील यास ताब्यात घेऊन अटक केली आहे. दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दि. २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संशयित आरोपींची घटनास्थळी दुचाकी जाळल्याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला पोहेकॉ अनिल देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. तपास पोउनि अलीयार खान करीत आहेत.