कान नाक घशाच्या त्रासावर रामबाण उपचार
शस्त्रक्रिया, औषधींद्वारे रुग्णांना दिलासा
जळगाव (प्रतिनिधी) – कान दुखणे, कानातून पाणी येणे, नाकाचे वाढलेले हाड दुखणे, गिळतांना घशात दुखणे किंवा काहीतरी अडकले आहे अशी जाणीव होणे असे विविध लक्षणे कान नाक घसा या इंद्रियांची असतात. त्यामुळे कान नाक घशाची कुठलाही त्रास आता अंगावर काढण्याची आवश्यकता नाही, डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयातील कान नाक घसा विभागाद्वारे रामबाण उपचार केले जातात.
डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात कान नाक घसा या विभागात तज्ञ डॉक्टरांची ओपीडी सोमवार ते शनिवार सकाळी १० ते ५ या वेळेत सुरु असते. रुग्णालयात आल्यावर सर्वप्रथम नि:शुल्क केसपेपर काढून घ्यावा व पहिल्या मजल्यावरील कान नाक घसा विभागाच्या ओपीडीत जावे. तेथे कान नाक घसा विकार तज्ञ डॉ.अनुश्री अग्रवाल, डॉ.पंकजा बेंडाळे, डॉ.तन्वी पाटील, निवासी डॉ.चारु, डॉ.रितू, डॉ.बासू, डॉ.जान्हवी अशी टिम असते.
येथे रुग्णांनी येवून निसंकोचपणे होणारा त्रास सांगावा, जेणेकरुन डॉक्टरांना निदान व उपचार करणे लगेच शक्य होते. अनेकदा केवळ औषधोपचाराद्वारेही रुग्ण बरा होतो. परंतु काही वेळेस शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो मात्र रुग्णांमध्ये शस्त्रक्रियेची भिती असते. परंतु रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांद्वारे आतापर्यंत हजारो रुग्णांवर खात्रीशीर उपचार केले असून रुग्णांची वेदनेतून सुटका केली आहे. त्यामुळे रुग्णांनी शस्त्रक्रियेची भिती बाळगू नये असे आवाहनही कान नाक घसा विभागातर्फे करण्यात आले. नाकाचे सडलेले हाड, कानाचा पडदा, नासूर, थायरॉईड अशा कुठल्याही आजारावरील उपचाराच्या माहितीसाठी निवासी डॉ साईकत बासू ८९९९८१६३७५ यांच्याशी संपर्क साधावा.