पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील कळमसरा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश सचिव वंदना अशोक चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त गावात ग्रामस्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात ग्रामस्थांनी गावातील रस्त्यांची साफसफाई केली. तर महिलांच्या शौचालयांची देखील स्वच्छता करण्यात आली.
राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे वंदना चौधरी यांचा वाढदिवसानिमित्त श्रीराम मंदिरात सत्कार करण्यात आला. तसेच व्रुक्षप्रेमी, निसर्गप्रेमी आणि गंगा नर्सरीचे संचालक दत्तात्रय तावडे यांना “पर्यावरण मित्र पुरस्कार 2020-21” देवून सन्मानित करण्यात आले. या वेळी दहावीच्या परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि सैन्यात नुकतेच रुजू झालेल्या जवानांचा देखील सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यात योगदान लाभलेल्या व्यक्तींना “कोरोना योद्धा” पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रवींद्र सावंत, शिवाजी देशमुख, शिवाजी घुले, रमेश तेली, प्रकाश देशमुख, संतोष बोखारे आदींचा गौरव करण्यात आला.
राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक विविध कार्यक्रम, उपक्रमांची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष युवराज वामने पाटील, संचालक योगेश वाघ यांनी दिली. या स्तुत्य उपक्रमांचे कौतुक वंदना चौधरी, शेंदुर्णी जिनिंगचे संचालक अशोक चौधरी यांनी केले. संस्थेला यथोचित मदतीचे आश्वासन चौधरी दांपत्याने दिले. गौरी उद्योग समूह आणि महाराष्ट्र खान्देश कुणबी पाटील वधू-वर सूचक केंद्राचे संचालक सुमित पाटील यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार करण्यात आला. सोशल मीडियात सक्रीय सहभागाबद्दल पी.आर.वाघ यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार ज्ञानेश्वर वाघ यांनी केले. आभार उपसरपंच कैलास चौधरी यांनी मानले.