यावल पोलिसांची साकळी येथे कारवाई
यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी येथे कॉलनी वसाहतीत ट्रकमध्ये जास्त नफा मिळविण्याच्या हेतूने तांदूळ भरीत असताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. याबाबत यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली असून पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुन्हा दाखल केला जाणार आहे.
शासनाच्या स्वस्त धान्य दुकानातून मोफत तांदूळ, गहू वाटप होत असतात. काही दुकानदार गोदाममध्ये एकत्रित करून जास्त नफा मिळवण्यासाठी बाहेरगावी विक्रीला पाठवतात. अशाच एका माहितीवरून यावल पोलिसांनी नजर ठेवून साकळी येथील कॉलनी वसाहतीतील पत्री शेडमधून ट्रकमध्ये तांदुळ भरताना रंगेहात पकडून पोलीस स्टेशनला आणले आहे. तपासणीसाठी पुरवठा अधिकारी तसेच यावल तहसीलदार यांच्याकडे पत्र देण्यात येणार आहे. नंतर चौकशीअंति गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.