जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवाजी नगर उडाणपूलापासून ते दूध फेडरेशन पर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा दुरुस्तीसाठी निधी प्राप्त होऊन देखील गणेशोत्सवापूर्वी रस्त्याची दुरुस्ती न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत .
शहरातील शिवाजीनगर उड्डाणपूलापासून दूध फेडरेशनपर्यंत जाणारा रस्ता नागरिकांना अडचणींचा होत आहे काही दिवसापासून कानळदा रस्त्यापासून भोईटे नगर रेल्वे गेट पर्यंत पुलाचे काम सुरु असल्याने हा रस्ता खड्डेमय बनलेला असून सध्या पावसाचे दिवस असल्याने दररोज लहान मोठे अपघाताची मालिका सुरु आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी दिली.
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मनपाने मंजूर केलेल्या 42 कोटीचा आराखडातील पाच कोटी रुपये रक्कम प्राप्त होऊन देखील व वारंवार जिल्हाधिकारी यांनी याबाबत सूचना देऊन ही या रस्त्याची दुरुस्ती गणेशोत्सवापूर्वी न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत