• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कलावंत परिचय – ४ (द्वितीय दिन द्वितीय सत्र)

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 28, 2024
in जैन कंपनी, जळगाव, भारत, विश्व
0
कलावंत परिचय – ४ (द्वितीय दिन द्वितीय सत्र)

श्रींजीनी कुलकर्णी (कथक)

खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून संपूर्ण भारत वर्षात ख्यातनाम असलेला स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान आयोजित व संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि., जळगाव जनता सहकारी बँक, सुहान्स केमिकल्स, जाई काजळ, वेगा केमिकल्स, चांदोरकर टेक्नॉलॉजीज (ओपीसी) प्रा. लि. होस्टिंग ड्युटी,  पु. ना. गाडगीळ सन्स लि. प्रायोजित २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येत आहे.
इतिहास विषयात ग्रॅज्युएशन केलेली अत्यंत उत्तम अशी कथक नृत्यांगना आहे. वार्षिक वसंतोत्सवात दरवर्षी श्रींजिनी आपली कला सादर करीत असते. आजोबा पंडित बिरजू महाराजांचा वारसा समर्थपणे चालवणारी श्रींजीनी ही तरुण व आश्वासक अशा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी कलावंत आहे. देश विदेशात आपली कला सादर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्क, ह्युस्टन, बँकॉक, ऑस्टिन,  इत्यादी ठिकाणी रसिकांनी तिला डोक्यावर घेतले आहे. तिने नुकताच एक फ्युजन बँक सुरू केला असून त्यामध्ये अभिजात शास्त्रीय संगीताचा आत्मा तसाच ठेवून सादर केला जातो. या बँड मध्ये सर्व तरुण वादकांचा समावेश असून यात अणुव्रत चटर्जी, एस. स्वामीनाथन, शिखरनाद कुरेशी, ईशानी डे, व आय. डी. राव हे तालवादक आहेत.

नुकताच मुजफ्फर अली यांचा आलेला जानीसार या चित्रपटात तिने विविध डान्स सिक्वेन्स सादर केले आहेत. यामधील नृत्याचे दिग्दर्शन पंडित बिरजू महाराजांनी केले आहे. नृत्या बरोबरच श्रींजीनीने अभिनयातही आपला ठसा उमटवला आहे. बंगाली चित्रपट हर हर ब्योमकेश या पं. विक्रम घोष यांच्या चित्रपटात तिने काम केले आहे. वयाच्या ५ व्या वर्षांपासून श्रींजिनी कथकचे धडे आजोबा पं. बिरजू महाराज यांच्याकडे गिरवू लागली. वयाच्या ८ व्या वर्षी श्रींजिनीने आपला जाहीर कार्यक्रम सादर केला. भारतातील अनेक नामवंत महोत्सवात तिने आपली कला सादर केली आहे यात प्रामुख्याने खजुराहो डान्स फेस्टिवल, कालिदास फेस्टिवल, संकट मोचन समारोह, जशन ए रेखता, ताज महोत्सव, चक्रधर समूह समारोह कथक महोत्सव इ. होत. यावर्षी ती आपल्या बालगंधर्व संगीत महोत्सवात कथक नृत्य सादर करणार आहे. देश विदेशात श्रींजिनीचे होणारे कार्यक्रम म्हणजे रसिकांसाठी एक पर्वणीच असते. संत मीराबाई, कृष्ण कथा असे थिमॅटिक कार्यक्रमही ती सादर करते. अशा या चतु:रस्त्र कलावंताला पाहण्याचे व तिचा कथ्यक नृत्यविष्कार पाहण्याची संधी जळगावकरांना मिळते आहे ती बालगंधर्व संगीत महोत्सवामुळेच.

अशा या हरहुन्नरी कलाकाराची नृत्य सेवा याची देही याची डोळा पाहण्याची व अनुभवण्याची संधी २३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या निमित्ताने जळगावकर रसिकांना मिळाली आहे. त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती प्रतिष्ठानच्या विश्वस्तांसह प्रायोजकांनी केली आहे.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraकलावंत परिचय - ४ (द्वितीय दिन द्वितीय सत्र)श्रींजीनी कुलकर्णी (कथक)
Previous Post

कलावंत परिचय – ३ (द्वितीय दिन प्रथम सत्र)

Next Post

“लाडक्या भावां”कडे राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत कालावधी वाढवून देण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
“लाडक्या भावां”कडे राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत कालावधी वाढवून देण्याची मागणी

"लाडक्या भावां"कडे राज्य प्रशासनाचे दुर्लक्ष, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अंतर्गत कालावधी वाढवून देण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल
1xbet russia

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

February 24, 2026
जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !
1xbet russia

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

जळगावात भरदिवसा सोनसाखळी लांबवली

February 24, 2026
शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा
1xbet russia

शिरसोलीत तरुणांची मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या; ताडे कुटुंबावर शोककळा

February 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बंद घर फोडून दागिन्यांसह मोबाईलची चोरी ; गुन्हा दाखल

भरदिवसा घरफोडी; २ लाखांचा दागिन्यांचा मुद्देमाल लंपास

February 24, 2026
जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

जळगावात पुन्हा मॉब लिचिंग : मुलाला पळविण्याचा अफवेने तरुणाचा मारहाण करून खून !

February 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon