पुणे(वृत्तसंस्था ) ;- जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकार तज्ज्ञ माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे व्रुध्दापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती. साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते.