सामूहिक विवाह साेहळ्यात सात जाेडपे विवाहबद्ध
जळगाव (प्रतिनिधी) :- मुस्लिम काकर समाजाने सामुहिक विवाह साेहळा घडवून आणला. आपल्या कृतीतून त्यांनी समाजातील गरजूंची मदत केलेली आहे. विवाह सोहळ्याचा खर्च सामान्य कुटुंबाला आज परवडणारा नाही. काकर समाजाचे कार्य काैतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कॅन्सर तज्ज्ञ डाॅ. निलेश चांडक यांनी केले.
येथील काकर समाजातर्फे आयोजित सामूहिक विवाह साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चांडक उपस्थित हाेते. विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाले. यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते गणेश साेनवणे, अशाेक लाडवंजारी, विक्की बजाज, जेष्ठ पत्रकार वाहिद काकर,राजु बर्तनवाला आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष रियाज काकर यांनी सांगितले की, आजचा हा पाचवा सामूहिक विवाह साेहळा आयोजित करण्यात आला. समाजबांधवांची कायम साथ राहिली तर आणखी बरेच उपक्रम समाजासाठी राबविण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. यावेळी सेवािनवृत्ती निमित्त मुख्याध्यापक मुश्ताक करिमी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्तािवक व सुत्रसंचालन फारुख अमीर काकर यांनी केले. उपस्थितांचे आभार कौसर काकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी काकर समाजाचे पंच माेहसीन युसुफ काकर, कौसर काकर, हुस्नाैद्दीन काकर, मुश्ताक गुलाब काकर, विक्की अख्तर काकर, रफीक चांद, वसीम सट्टा, बबलू यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.