भडगाव ( प्रतिनिधी ) – कजगाव येथे गणपती, संत सावता महाराज व विठ्ठल रुख्मिणी मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिम्मित तीन दिवस प्राणप्रतिष्ठा विधीचे आयोजन करण्यात आले कीर्तन सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे कजगावसह पंचक्रोशीतील भाविकांनी कीर्तन श्रवनाचा लाभ घेण्याचे आवाहन माळी समाज मंडळ यांनी केले आहे
कजगाव – नागद मार्गावरील जिन भागात संत सावता मंगल कार्यालयाच्या आवारात सावता महाराज मंदिर उभारण्यात आले आहे मंदिरात गणपती, संत सावता महाराज व विठ्ठल रुख्मिणी मुर्ती विधिवत बसविण्यात येत आहेत प्राणप्रतिष्ठा विधीचे शासनाच्या नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले आहे आज मिरवणुक सोहळा आयोजित करण्यात आला होता ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढचे तीन दिवस धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे ह.भ.प.विश्वनाथ महाराज वाडेकर,.ह.भ.प.ईश्वर महाराज पाळधीकर, ह.भ.प.रविंद्र महाराज वरसाडेकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे
मुर्ती प्राणप्रतिष्ठासाठी संत सावता महाराज यांचे वंशज ह.भ.प.रविकांत महाराज (अरण भेंडी) यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे आमदार किशोर पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून बनविण्यात आलेल्या सामाजिक सभागृहचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे हिलाल चौधरी यांनी वडील कै. त्रंबक चौधरी यांचे स्मरणार्थ उभारलेल्या प्रवेशद्वाराचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांचे हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, भडगावच्या सभापती डॉ.अर्चना पाटील, भडगाव तालुका शिवसेना प्रमुख डॉ. विलास पाटील, कजगावच्या लोकनियुक्त सरपंच वैशाली पाटीलसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी शिक्षण सभापती एकनाथ महाजन , माळी समाजाचे अध्यक्ष रघुनाथ महाजन, माजी अध्यक्ष विक्रम महाजन, ग्रा प सदस्य हिलाल चौधरी, पोपट महाजन, रघुनाथ जाधव, पांडुरंग महाजन, निंबा महाजन , अनिल महाजन, किशोर महाजन, सुनील महाजन, अनिल टेलर, संजय महाजन, रामचंद्र चौधरी , कैलास महाजन, राजेंद्र चौधरी, आबा महाजन , भैय्या महाजन, रावसाहेब महाजन, सागर महाजन, दत्तू चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, पोपट चौधरी, समाधान चौधरी व ग्रामस्थ सहकार्य करीत आहेत