कजगाव (प्रतिनिधी) -भडगाव तालुक्यातील कजगाव येथे आय पी इन्वस्टीगेशन टीम ने छापा टाकत हजारो रुपयांचा माल हस्तगत केला, कजगाव येथील गुरुप्रसाद प्रोविझन येथे साबळे अँड वाघिरे कंपनीचां बनावट असलेल्या संभाजी विडी ची विक्री होत असल्याची तक्रार होती, त्यानुसार आय पी चे तपास अधिकारी अनिल मोरे यांनी भडगाव पोलीस स्टेशन चे पो नि श्री. येरुळे यांच्या मार्गद्शनाखाली असिस्टंट नागरे आणि सहकारी विजय पाटील यांच्या सोबत हजारो रुपयांचा बनावट माल हस्तगत केली. सदर कारवाई मुले परिसरात बनावट माल विक्री करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली असून, आय पी टीम चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.