भडगाव ( प्रतिनिधी ) – कजगाव येथे महादेव मंदिरात दोन दिवसीय कलशारोहन व भगवान महादेव प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे
माजी सरपंच कै भरतसिंग रामसिंग पाटील यांच्या शेतातील नवीन महादेव मंदिरात भोलेनाथ प्राणप्रतिष्ठापना अमळनेरचे संत प्रसाद महाराज (संत सखाराम महाराज संस्थान अमळनेर) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दि २५ डिसेंबर रोजी संध्याकाळी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे २६ डिसेंबर रोजी महादेव प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे भाविकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थांनी केले आहे