नशिराबाद मध्ये डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते शुभारंभ
जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवांश क्रिएशन अँड इंटरटेनमेंट आणि सहनिर्माता बंधन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित होणाऱ्या ‘काजळी’ या मराठी चित्रपटाचा शानदार मुहूर्त सोहळा नशिराबाद येथे आज उत्साहात पार पडला. या महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या मुहूर्ताचे उद्घाटन जळगावचे माजी खासदार आणि गोदावरी समूहाचे अध्यक्ष डॉ. उल्हासराव पाटील यांच्याहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी बोलताना डॉ. पाटील यांनी, याच टीमच्या ‘ते दहा दिवस’ या पूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचा खास गौरव करत ‘काजळी’ च्या संपूर्ण टीमला त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या भव्य समारंभाला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, विकासराव पाटील, मुकुंदा रोटे, योगेश पाटील, पत्रकार नितीन नांदुरकर, रवींद्र म्हसकर, भागवत श्रावण चौधरी, वसंतराव ठाकूर, क्रांतिकांत चौबे, ज्ञानदेव मंगा पाटील हे उपस्थित होते.









