कैलास सूर्यवंशी यांचा सदस्यत्वाचा राजीनामा
जळगाव (प्रतिनिधी) – एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाला खिंडार पडायला सुरुवात झाली आहे. चाळीसगाव येथील माजी परदेश सरचिटणीस कैलास सूर्यवंशी यांनीदेखील प्रदेशाध्यक्षांकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा पाठविला आहे.
राजीनामा पत्रात कैलास सूर्यवंशी यांनी म्हटले आहे की, कॉग्रेस घराणेशाहीच्या विरोधात ठाम उभे राहून समाजाच्या तळागाळात पोहोचण्यासाठी एकनाथराव खडसे यांनी आयुष्यातील अनेक वर्षे कारची घातली. खडसेंनी कधी पायी, कधी सायकलीने, बैलगाडीने प्रवास करीत खेडोपाड्यात भाजप पोहोचवली. त्यांचा संघर्ष मी पहिला आहे. त्यांनी मला बोट धरून राजकारणात मोठे केले. त्यांच्या सन्मानाच्या समर्थनार्थ मी भारतीय जनता पक्षाचा व पक्षाशी निगडित सर्व पदाचा राजीनामा देत आहे. असेही सूर्यवंशी यांनी म्हटले आहे.







