जळगाव (प्रतिनिधी) ;- कैकाडी समाजातील नागरिक आणि महिलांना त्यांच्या अधिकाराविषयी माहिती व्हावी आणि त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी याबाबत
जळगाव जिल्हा कैकाडी समाज आघाडीचे सचिव संदीप सुरेश जाधव यांनी भाजप भटके विमुक्त आघाडीचे पदाधिकारी नरेंद्र पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे कि , कैकाडी समाजातील महिला बऱ्याच क्षेत्रात प्रगती करीत असून त्यांना अडचणींचाही सामना करावा लागत आहे. समजतील महिला आत्मनिरभर आणि सक्षम होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.








