जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण तलावाच्या भागात २ जिवंत काडतुसे आणि गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या संशयिताला काल पोलिसांनी अटक करून त्याच्या ताब्यातून काडतुसांसह गावठी पिस्तूल जप्त केले आहे.
पो कॉ छगन तायडे यांनी दाखल केलेल्या या फिर्यादीत नमूद केले आहे की , काल शहरातील मेहरूण तलावाच्या भागात कृष्ण लॉन्सच्या मागे एक संशयित व्यक्ती गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून सहाय्यक फौजदार अतुल वंजारी , पो ना . इम्रान सय्यद , योगेश बारी , पो कॉ मुदस्सर काझी , किशोर पाटील , मुकेश पाटील , सचिन पाटील , साईनाथ मुंडे यांच्या पथकाने या भागात संशयिताला शोधून त्याची चौकशी केली आणि त्याच्या ताब्यातून १६ हजार रुपये किमतीचे २ जिवंत काडतुसे आणि गावठी पिस्तूल जप्त केले पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला योगेश अंबादास बारी ( वय ३१ , रा- बारीवाडा , पिंप्राळा ) असे या आरोपीचे नाव आहे त्याच्या विरोधात भारतीय हत्यार अधिनियम कलम २ / २५ मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ ( १) , (३ ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.