जळगाव तालुक्यात नशिराबादच्या कंपनीतील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील नशिराबाद येथील सुबोनिया केमिकल्स कंपनीत मालकाचा विश्वासघात करून तेथील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ३ लाख रुपयांचा ऑरगॅनिक कच्चा माल परस्पर चोरून स्वतः करिता त्याचा वापर केला, म्हणून नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
सुयोग सुधाकर चौधरी (वय ४८, रा. एमआयडीसी, जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची नशिराबाद शिवारामध्ये सुबोनिया केमिकल्स कंपनी आहे. (केसीएन)या कंपनीमध्ये अमित कमलाकर बेंडाळे (रा. सांगवी ता. यावल) आणि विरेंद्र खुबलाल विश्वकर्मा (रा. खडका ता. भुसावळ) हे काम करीत होते. त्यांनी दि. १ ऑगस्ट २०२४ ते दि. ३१ जानेवारी २०२५ च्या दरम्यान कधीतरी सुबोनियो केमिकल्स कंपनीत काम करत असताना संगनमत करून कच्चामाल संमती वाचून चोरून नेला.
तसेच स्वतः करिता त्याचा वापर केला. म्हणून सुयोग चौधरी यांनी नशिराबाद पोलीस स्टेशनला शुक्रवारी दि. ११ एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजता फिर्याद दिली आहे.(केसीएन)त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी ए. सी. मनोरे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहे.