जळगाव (प्रतिनिधी) – आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी हे उद्या दि. 6 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.यावेळी दुपारी 12.30 वाजता काँग्रेस भवनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. संदीप सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी विकास मंत्री तथा जळगांव जिल्हा संपर्क मंत्री ना.के.सी.पाडवी यांचा सत्कार समारंभ तसेच त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष संघटनात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या बैठकीस आजी माजी पदाधिकारी खासदार, आमदार, जिल्हा काँग्रेस व शहरचे पदाधिकारी,सदस्य, फ्रंटल व सेलचे जिल्हा व तालुकाध्यक्ष, जि.प.चे आजी, माजी सदस्य, जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील यांनी केले आहे.