जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील ज्वेलर्स दुकान ज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नाना तुकाराम सोनार (वय-५०) रा. वाणी गल्ली, म्हसावद यांचे बोरनार रोडवर स्वाती ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. नाना सोनार यांनी २३ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी गेले होते. .मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्स दुकान फोडून दुकानातील सोन्याचे व चांदीचे दागिने असे एकुण ५६ हजार ३०० रूपयांचा मु्देमाल चोरून नेल्याचे २४ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आले. याबाबत ज्वेलर्स दुकानाचे मालक नाना सोनार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवारी २८ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.