जळगावात मेहरूण परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या वादाच्या कारणावरुन चौघांनी मनोहर सुधाकर बाविस्कर (वय ३५, रा. भिलाटी, मेहरुण) या तरुणाला मारहाण करीत त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून जखमी केले. ही घटना दि. ३१ जानेवारी रोजी घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील भिलाटी परिसरात मनोहर मधुकर बाविस्कर हा तरुण वास्तव्यास आहे. दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जून्या भांडणाच्या कारणावरुन सुनिल शिरसाठ, विजय शिरसाठ, युवराज शिरसाठ व चेतन शिरसाठ या चौघांनी मनोहरच्या घरी येवून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी सुनिल शिरसाठ याने त्याच्या हातातील लोखंडी रॉड मनोहरच्या डोक्यात मारुन त्याला गंभीर जखमी केले. तसेच त्याला बघून घेईल अशी धमकी देखील दिली. जखमी मनोहरने तात्काळ एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार सुनिल मंगेश शिरसाठ, विजय मंगेश शिरसाठ, युवराज मंगल शिरसाठ, चेतन युवराज शिरसाठ (सर्व रा. रेणुका नगर, मेहरुण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.