अमळनेर तालुक्यात अथक प्रयत्नांनी चार तासांनंतर आग आटोक्यात
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यात जुनोने येथील वनक्षेत्राला अचानक आग लागून २२ हेक्टर जंगल आणि शेतांचे नुकसान झाले आहे. तब्बल ४ तासानंतर अग्निशमन दल, गावकरी आणि वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात यश मिळाले.
अमळनेर तालुक्यात ४ दिवसात ३ मोठया आगी लागून मोठे नुकसान झाले आहे. अंबर्षी टेकडीपाठोपाठ सात्री गावात आग लागली. दि. ६ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुनोनेच्या वनक्षेत्राला आग लागली. त्याठिकाणी रोपवन केलेले असल्याने चराई बंदी होती आणि जमिनीची धूप होऊ नये म्हणून गवत वाढलेले होते. वनविभागाने आगीची माहिती मुखायधिकारी तुषार नेरकर याना कळवताच त्यांनी तातडीने दोन अग्निशमन बंब पाठवले. मात्र जंगलात अग्निशमन बंब जाऊ शकत नसल्याने आग विझवण्यास त्रास होत होता. अग्निशमन दल प्रमुख गणेश गोसावी, दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छीन्द्र चौधरी, आकाश संदानशिव,आकाश बाविस्कर या कर्मचाऱ्यांसोबत वनपाल प्रेमराज सोनवणे, वनरक्षक सुप्रिया देवरे, वनमजुर अधिकार पारधी, प्रवीण पाटील, समाधान पाटील, मयूर पाटील हे वन कर्मचारी, पोलीस पाटील उमेश महाले, पोलीस पाटील नरेंद्र पवार यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.