जळगावातील संभाजी नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : जुन्या भांडणाच्या कारणावरुन तरुणाला एका जणाने शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना १५ रोजी संभाजीनगर परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण भिकन जाधव (३३, रा. कोल्हे हिल्स परिसर) हा मोबाईल व्यावसायिक आहे. महाबळ परिसरात त्याचे दुकान आहे. रविवारी दुपारी एका तरुणाने त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर मारहाण केली. अरुण जाधव याने दिलेल्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नीलेश पाटील करीत आहेत.