रावेर शहरातील नागरिकांची मागणी
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुना सावदा रोडवरील पुलाच्या कामाला सुरुवात करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील अनेक नगरांशी जोडणारा हा रस्ता आहे.
शहरात नविन पुल होऊ घातलेला आहे. परंतु सदरचे काम संथ गतीने होत आहे. त्यामळे रावेरवासियांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, गैरसोय निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी या संदर्भात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. तात्पुरत्या स्वरूपात समजूत घालून तोडगा काढण्यासाठी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. परंतु, त्याचा काहिएक फायदा झालेला दिसून आलेला नाही. म्हणून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येऊन, या पुलाचे बांधकाम सुरू करावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरीक करीत आहेत.