जळगाव (प्रतिनिधी )- येथील ईश्वर कॉलनीतून मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरटयांनी पायी चालणार्या महिलेच्या गळ्यातून ३५ हजार किमतीचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना घडली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सोनसाखळी लांबविणारे चोरटे सक्रिय झाल्याने महिला वर्गात घबराटीचे वातावरण आहे.
सुनांनी दिलेली माहिती अशी कि, शीतल संजय रोकडे (वय-५२) रा. ईश्वर कॉलनी हे कुटुंबियांसह राहतात. ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कामानिमित्ताने त्या घराबाहेर गेल्या असता समोरुन भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीवरील दोघांनी शीतल रोकडे यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची मंगळसूत्र ओरबाडून पलायन केले.याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे हे करीत आहेत.








