भुसावळ ;- वर्तमानाची परिस्थिती पाहता आपल्या देशात कोरोना सारख्या महाभयानक आजार covid-19 जखडलेलं आहे. त्या मुळे आपला देश बिकट परिस्थितीतुन जात आहे . अशा परिस्थितीत रेल्वे कर्मचारी यांची परिस्थिती पाहता होणारी अत्यावश्यक वस्तूची विक्री पाहता रेल्वे कर्मचारी यांचे भरणं-पोषण यांचं सामना करावा लागत आहे . सेंट्रल रेल्वे सहकारी पत संस्था यांना रिझर्व बँकेची यांच्या निर्देशा नुसार पुढील तीन महिन्याचे कर्जाचे हप्ते न कापता व कुठल्याही प्रकारची अतिरिक्त व्याजदर न लावता तसेच पुढील तीन महिने कर्जाचे हप्ते कापण्यात नाही यावे अशी विनंती विनायक पाटील डी.आर.यु.सी.सी मेंबर भुसावल मंडल यांच्यातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच पत्राद्वारे व्ही.एस.सावंत अध्यक्ष ई.सी.सी सोसायटी लिमिटेड भायखळा मुंबई तथा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना ट्विटर च्या माध्यमातून विनंती करण्यात आली.