जळगाव (प्रतिनिधी) – रतनलाल सी बाफना यांच्यावर आज संध्याकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र सिद्धार्थ बाफना व राजकुमार बाफना यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.


यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्यांना शोक अनावर झाला. अंत्यसंस्कारावेळी समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर नागरिक आणि गोप्रेमी उपस्थित होते.

यावेळी उद्योजक अशोकभाऊ जैन, माजी मंत्री गिरिष महाजन, माजी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, खा. ईश्वरलाल जैन, आ. राजु मामा भोळे, आ. चंदभाई पटेल, माजी खा.डॉ. उल्हास पाटील,गोसेवक अजय ललवाणी, माजी महापौर रमेशदादा जैन, भरतदादा अमळकर, कवरलालजी संघवी, माजी आ.मनिष जैन, स्वरुप लुंकड, भागवत भंगाळे , मल्हार कम्युनिकेशनचे आनंद मल्हारा, देवीचंद छोरीया,दीपस्तंभचे यजुर्वेद महाजन यांच्यासह समाजातील व्यापारी, उद्योजक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्रध्दांजली सभा/उठवणा
दि.18 बुधवार रोजी सकाळी 10 वाजेला. जळगांव शहरातील ,गणपती नगर मधील रतनाल सी बाफना स्वाध्याय भवन येथे आयोजीत करण्यात आले आहे .







