धुळे ;-धुळे मनपा व मोहाडी पोलीसांची संयुक्त कामगिरी औद्योगिक वसाहतीतील गोडावून मध्ये दडवलेला प्लास्टिकचा पावणे दोन लाखांचा साठा जप्त व दंडात्मक कारवाई करण्यात आली .
देशात लॉक डाऊन चा चौथा टप्प्याला सुरवात झाली आहे.शहराजवळील औद्योगिक वसाहतीतील श्याम रेलन यांचे मालकीचे गुरमुख प्लास्टिक चे गोडावून आहे.यात प्लास्टिक कमी प्रतीच्या पिशव्या लॉक डाऊन सुरू असताना होलसेल दरात विक्री केली जात आहे.व काही माल दडवून ठेऊन जादा दराने विक्री केली जात आहे.अशी माहिती सहा.आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील यांना मिळाली त्यांनी मोहाडी पोलिस ठाण्यातील सपोनि संगिता राऊत सह प्लास्टिक गोडावूनवर संयुक्तपणे छापा टाकला.त्यात कमी दर्जाच्या प्लास्टिक लहान,मोठ्या आकाराच्या पिशव्या,कॅरी बॅग असा एकुण पावणे दोन लाखांचा माल कारवाईत जप्त करण्यात आला आहे व मालक श्याम रेलन यांना प्लास्टिक साठा करून ठेवला प्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
अशी माहिती सहा.आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील यांनी दिली.मोहाडी पोलीस ठाण्यातील महिला अधिकारी सपोनि संगिता राऊत,पोकॉ निकम ,मनपा कर्मचारी संदिप मोरे, राजेश वसावे,भटू वाघ आदी उपस्थित होते.