जैन इरिगेशनच्या अग्निशामक बंबाने आग आटोक्यात ; मोठ्या प्रमाणात नुकसान
जळगाव ;- तालुक्यातील शिरसोली येथे आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास आकाशवाणी केंद्राच्या प्रक्षेपण कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली असून हि आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे . यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समजते . यावेळी कार्यालयातून मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट निघत असल्याने मोकळ्या मैदानात कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. आग विझविण्यासाठी जैन हिल्स येथील १ अग्निशामक बंब मागविण्यात आला होता . हि आग आटोक्यात आणण्याचे अग्निशामक दलाचे जैन इरिगेशनचे सुपरवायझर कैलास सैंदाणे ,मनोज पाटील, महेंद्र पाटील, दीपक कापसे आदींनी प्रयत्न केले. घटनेचे वृत्त समजताच आकाशवाणी केंद्राजवळ मोठी गर्दी झाली आहे.