जामनेर प्रतिनिधी:- जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत ग्राम पंचयत निवडणुकीत 7 सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीची निवड बिनविरोध झाली. या मध्ये – 1 हरी अंबादास सिसोदिया,2 संगीता सुधीर सिसोदिया 3 रोहिणी दिगंबर सिसोदिया 4 ललिता एकनाथ जोहारे 5 मिनाबाई गजानन सिसोदिया या सदस्यांची बिनविरोध निवड झाली. राष्टरवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर आप्पा पाटील जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत पदवीधर संघ जिल्हा अध्यक्ष पुंडलिक पाटील यांनी गावात जाऊन त्यांचे अभिनंदन केले सर्व निवडून आलेले सदस्य चे माजी पालकमंत्री आदरणीय एकनाथ राव खडसे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भय्यासाहेब पाटील जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिनीताई खडसे तालुक्याचे नेते आदरणीय संजयदादा गरुड दिगंबर दादा पाटील प्रदीप भाऊ लोढा जिल्हा परिषद सदस्य प्रमिला ताई पाटील यांनी अभिनंदन केले 7 सद्स्य असलेल्या या ग्रामपंचायत मध्ये 5 सदस्य हे राष्ट्रवादीचे असल्या मुळे तालुक्यात विजयाचा शुभारंभ झालेला आहे एकूण 4 ग्रामपंचायत बिनविरोध झालेल्या आहे.








