एनएसयू आयच्या मागणीला यश
एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी मानले उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आभार
जळगाव ;- जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळं जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी ढाकणे यांची बदली झाल्यांनतर एन एस यु आय ने राज्य सरकारचे आभार मानले आहेत
गेल्या अडीच महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये कोरोणा आजाराचे महासंकट उभे राहिले कधीकाळी ग्रीन झोन मध्ये असणारा जळगाव जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमुळे रेड झोन मध्ये गेला
जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी हेतुपुरस्कर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करत जिल्ह्याची अति गंभीर परिस्थिती निर्माण होऊ दिली. अशा बेजबाबदार व अकार्यक्षम अधिकाऱ्यांबद्दल एन एस यू आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दूरध्वनीवरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क करून संबंधित अधिकाऱ्यां बद्दल व निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल माहिती देऊन तात्काळ जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांची बदली करावी अशी मागणी केली होती एनएसयूआयच्या या मागणीला यश आले नवीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत व अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची नियुक्ती केली .अभिजीत राऊत हे सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदी होते
2013च्या आय ए एस बॅच चे राऊत यांनी काही काळ नंदुरबार जिल्ह्यात देखील उपजिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे
जिल्ह्यातील नागरिकांना एन एस यू आय च्या वतीने आवाहन आहे की जिल्ह्याला अधिकारी कितीही चांगले मिळाले तरी जिल्ह्याचे नागरिक म्हणून आपणा सर्वांचे कर्तव्य आहे की जिल्ह्यातील प्रशासनाला सहकार्य करावे व गरज असेल तरच बाहेर पडावे अन्यथा घरातच राहून प्रशासनाला मदत करावी