जळगाव ;- जागतिक शांती समृद्धी, बंधुता आणि जातीय समरसतेसाठी एक बिगर सरकारी आणि गैर-राजकीय चळवळ म्हणून कार्यरत असलेल्या जम्मू-काश्मीर पीस फाउंडेशन (जेकेपीएफ) च्या महाराष्ट्र प्रदेश (चाप्टर) प्रवक्ते पदी जळगाव येथील स्वामी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पीस फाउंडेशन (जेकेपीएफ) चे चेअरमन डॉ. एफ. ए. भट आणि महाराष्ट्र प्रदेश (चाप्टर) अध्यक्ष रक्षंदा सोनवणे यांनी ही नियुक्ती केली असून, नुकतेच निवडीचे पत्र स्वामी पाटील(जळगाव) यांना प्राप्त झाले आहे.
जम्मू-काश्मीर पीस फाउंडेशन (जेकेपीएफ) ची स्थापना 1998 मध्ये झाली.गेल्या २० वर्षात अनेक शांतता मोर्चे, कार्ये, चर्चासत्रे आयोजित केली आहेत.ही संस्था जगातील ,समाजातील वातावरणात शांततेचे महत्त्व आणि जातीय सलोख्याबद्दल लोकांना शिक्षित करण्यात योगदान देत आहे. जेकेपीएफच्या वतीने राज्य स्तरावर 69 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शांतता परिषद, 256 शांतता परिषद आणि मदत वितरण शिबिरे आयोजित केली आहेत. जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण करण्यात या संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली. जेकेपीएफ केंद्र सरकार आणि राज्यातील लोकांमधील एक सेतू म्हणून काम करते. केंद्र सरकारच्या विविध विभागांनी मंजूर केलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जेकेपीएफ फाऊंडेशन प्रयत्नशील आहे. विशेषत: जम्मू-कश्मीर राज्यातील तरुण, अनाथ आणि विधवांसाठी.आत्तापर्यंत मोठे योगदान दिले आहे. आय एस ओ 9001:2015 मानांकन प्राप्त आहे.








