जळगाव ( प्रतिनिधी) ;- पिंप्राळा व उपनगरात कोरोना लसीकरण सुरू करण्याबाबत बऱ्याच दिवसापासून नागरिकांची मागणी लक्षात घेता येथे स्थानिक नगरसेवकांनी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडे मागणी करून पिंप्राळा शाळा क्र. ४८ निमडी शाळा) येथे आज २७ रोजी सकाळी १० वाजेपासून महापौर जयश्रीताई महाजन यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात करण्यात आली.
पिंप्राळा परिसरात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांना याचा फायदा होऊन जास्तीत जास्त नागरिक लसीकरण करून घेतील अशी भावना व्यक्त करण्यात आली. सदरील लसीकरण केंद्रास भेट देऊन लसीकरणा सुरुवात करतेवेळी नगरसेविका प्रतिभाताई कापसे, शोभाताई बारी, सुरेश सोनवणे, विजय पुंडलिक पाटील ,शफी भाई, मयूर कापसे, सामाजिक कार्यकर्ते अतुल बारी उपस्थित होते.