मुक्ताईनगर : – मी अर्थमंत्री असताना नाथाभाऊ हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. भाजप पक्षाला मोठं करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. तरिही खडसेंवर भाजपने वारंवार अन्याय केला. मी विधानसभेत भाषण करताना ‘कटप्पाने बाहुबली को क्यू मारा?’ असा प्रश्न उपस्थित करुन खडसेंवर होणारा अन्याय अधोरेखित केला होता. भाजपने मुक्ताईनगरमध्ये रोहिणीताई खडसे यांचा विधानसभेला पराभव केला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस या परभवाची दुप्पट परतफेड करेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही भाजपवर तोफ डागली. भाजपमध्ये जाणीवपूर्वक बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले जाते. ज्यांनी पक्षाला मोठे केले, त्यांच्यावरच बेछूट आरोप करण्यात येतात. जे बापाचे होत नाहीत, ते जनतेचे काय होणार? असा आरोप त्यांनी केला. आदरणीय पवार साहेबांनी जर मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला नसता तर माझे राजकीय जीवन संपुष्टात आले असते. पवार साहेबांनी माझे राजकीय पुर्नवसन केले असल्याची भावना खडसे यांनी बोलून दाखवली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आ. अनिलभाईदास पाटील, मा.आ. मनिष जैन, जिल्हाध्यक्ष रविंद्रभैया पाटील, रोहिणीताई खडसे, मा.आ. संतोष चौधरी, मा. आ. अरूणदादा पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष अब्दुल गफार मलिक, महिला जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, माफदा महाराष्ट्र अध्यक्ष व राष्ट्रवादी जिल्हा उपाध्याक्ष विनोद भाऊ तराळ, जिल्हा सरचिटणीस ईश्वर राहणे,प्रदेश सचिव संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस ललित बागुल, युवक जिल्हा अध्यक्ष रविद्र नाना पाटील, किसान सेल जिल्हा अध्यक्ष सोपान पाटील, माजी सभापति राजु माळी,माजी सभापति सुधाकर काका पाटील, कुषि बजार समिति बोदवळ सभापति निव्रती पाटील, जिल्हा कार्य अध्यक्ष दिपक पाटील,जिल्हा युवक समवयनक आबा पाटील जिल्हा महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील,योगेश देसले , विलास पाटील, माजी पं स , सदस्य किशोर चौधरी, पं स सदस्य सुनिता चौधरी,राजेश वानखेड़े रमेश पाटील, रामभाऊ पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,दशरथ कांडेलकर विशाल कोल्हे महाराज,ता अध्यक्ष युडी पाटील सर ता अध्यक्ष उद्धव पाटील, रावेर ता अध्यक्ष निळकंट पाटील, संदीप देशमुख, लिलाधर तोताराम पाटील, कार्य अध्यक्ष सोपान दुट्टे, विलास धायडे, पुरनाड संरपच मनिषा ताई देशमुख, वसंत सर रवि दांडगे,दिपक साळुखें, जिल्हा युवक उपाध्याक्ष पवनराजे पाटील, शिवराज पाटील, प्रविन पाटील, सुनिल काटे,जिल्हा युवक सरचिटणीस प्रविन दामोदरे,मयुर साठे, युवक ता अध्यक्ष शाहिद खान कार्य युवक अध्यक्ष राजेश ढोले, सोनु पाटील, पप्पु पवार, सारंग पाटील, गणेश पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.