दहिगाव ता. यावल :- जिल्ह्यातील व तालुक्यातील कोविंड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे , डॉ. गौरव भोईटे, व डॉ. नसीमा तडवी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र सावखेडासिम यांच्या मार्गदर्शनाखाली सावखेडासिम प्रा. आ. केंद्रा अंतर्गत कोळवद व वड्री ग्रा. पं. येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी व भूषण पाटील यांनी ग्रामसभा घेऊन कोविंड-19 बाबतच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी आर टी पी सी आर स्वॅब (टेस्ट) करून घेतली.
गावचे प्रथम नागरिक सरपंच याकुब विनायक तडवी , उपसरपंच शशिकांत चौधरी, सदस्य अनिल पाटील, विठ्ठल सूर्यवंशी, मंगला महाजन, मुमताज तडवी, लिलाबाई सूर्यवंशी, आरती अढायागे, जनाबाई बाऊस्कर, मिनाक्षी भिरूड, व मनिषा महाजन आदि
ग्रा.पं. चे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसह 20 व्यक्तीनी कोविड-19 तपासणीसाठी स्वॅब दिले. स्वॅब तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आले.
जनजागृती व शिबीर यशस्वीतेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. साजिद तडवी, डॉ. राहुल गजरे , भुषण पाटील, महेमुदा तडवी, प्रतिभा चौधरी, व आशा सेविका यांनी परिश्रम घेतले.