मुंबई ( वृत्तसंस्था ) ;- बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपची मागील रविवारी तब्येत बिघडली. त्याच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची अँजिओप्लास्टी केली. आता हळूहळू त्याच्या तब्येतीत सुधारणा होते आहे.
ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, अनुराग कश्यपच्या छातीत आणि शरीर दुखत असल्याची तक्रार केली. त्यानंतर डॉक्टरांनी चेकअप केले. लगेच अँजिओप्लास्टी केल्यानंतर समजले की अनुराग कश्यपच्या हृदयात ब्लॉकेज आहेत. त्यानंतर त्याला लगेच रुग्णालयात सर्जरीसाठी दाखल केले.