• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जीएसटी अधिकारी सांगून मागितली रक्कम, सापळा रचून उद्योजकांनी पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 2, 2023
in Uncategorized
0
जीएसटी अधिकारी सांगून मागितली रक्कम, सापळा रचून उद्योजकांनी पकडले

जीएसटी अधिकारी सांगून मागितली रक्कम, सापळा रचून उद्योजकांनी पकडले

जळगावातील एमआयडीसी परिसरातील घटना, गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – जीएसटी विभागाचा निरीक्षक असल्याचे सांगत उद्योजकांना वेगवेगळी भीती दाखवत त्यांच्याकडे २० ते ३० लाखांची मागणी करणाऱ्या तोतया जीएसटी अधिकाऱ्याला वैतागलेल्या उद्योजकांनीच पकडले. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेले वाहन घेऊन हा तोतया अधिकारी कंपन्यांमध्ये जाऊन धमक्या देत होता. त्याच्यावर संशय आल्याने त्याला पकडून शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  त्याच्यावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब दशरथ ठाकरे असे या तोतया अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगाव औद्योगिक वसाहत परिसरातील वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जाऊन उद्योजकांच्या कागदपत्रांची पाहणी करीत एक अधिकारी उद्योजकांना वारंवार त्रास देत होता. त्यात गेल्या दोन दिवसांपूर्वी हा तोतया अधिकारी उद्योजक अशोक मुंदडा यांच्या कंपनीत आला. कागदपत्रांची पाहणी केली. नाशिक येथील वरिष्ठ अधिकारी चौरसिया यांच्या नावाने तडजोडीची मागणी केली. त्यासाठी त्याने थेट ३० लाख रुपये मागितले. त्याच्यावर संशय आल्याने मुंदडा हे सावध झाले. तो तोतया अधिकारी शुक्रवारी पुन्हा येणार असल्याने त्यांनी भाऊ राजेश मुंदडा, मित्र उद्योजक दिलीप छत्रीवाला, ललित लढ्ढा यांना बोलवून ठेवले होते.

शुक्रवारी हा तोतया महाराष्ट्र शासन असा उल्लेख असलेली कार (क्र. एमएच १९, सीवाय ००२५) घेऊन कंपनीत पोहचला. त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून देतो, असे सांगितले. त्या वेळी त्याचे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले असता तो ते दाखवू शकला नाही. त्या वेळी त्याची उलट तपासणी केली असता तो माहिती देऊ शकला नाही. तोतया अधिकारी असल्याचा संशय आल्याने त्याच्या मोबाईल व कारची तपासणी केली असता त्याच्या कारमध्ये अनेक कागदपत्रे सापडली. त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या उद्योजकांकडे पैशांची मागणी केल्याचे चॅटमधून समोर आल्याचे मुंदडा यांनी सांगितले. यावेळी त्याने आरडाओरडा करीत, तुम्हाला मी सोडणार नाही, तुमच्यावर आता धाडीवर धाडी पडतील असे धमकी देऊ लागला.

सर्व उद्योजकांनी या तोतया अधिकाऱ्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानुसार अशोक मुंदडा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/jist-aadhikari-sangun-rakkm/
Previous Post

मराठा समाजावर लाठीचार्ज ; गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा

Next Post

अवैध वाळू व्यावसायिकांची हिम्मत वाढली, आणखी एका महिला अधिकाऱ्याला दमदाटी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नांदगाव येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

अवैध वाळू व्यावसायिकांची हिम्मत वाढली, आणखी एका महिला अधिकाऱ्याला दमदाटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon