जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथे ५२ वर्षीय व्यक्तीचा लोखंडी जिन्यावरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हिलाल रामदास डेंगळे हे शिरसोली प्र.न. येथे कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत शेतीतील मजुरीचे काम करून उदरनिर्वाह करतात शनिवारी रात्री ९ वाजता जेवण करून ते गच्चीवर गेले. गच्चीवरून लोखंडी जिन्यातून खाली उतरत असताना त्यांचा पाय घसरला व खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, हिरकणबाई, मुलगा प्रवीण आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली सोमवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.