कजगाव, ता. भडगाव (प्रतिनिधी) – येथील डेंग्यू हाटस्पॉट जीन परीसरातील साफसफाई लोकसहभागातून करण्यात आली जीन परीसरातील अनेक पाण्याचे डबके जेसीबीच्या साहाय्याने नष्ट करण्यात आले व परीसरातील रस्ता व पाणी साचणाऱ्या ठिकाणी जेसीबी फिरवरून सरळ करण्यात आला.


जीन परीसरातील संजय महाजन यांच्या संकल्पनेतून हा प्रश्न लोकसहभातुन सुटला आहे यावेळी संजय महाजन, मंगलसिंग पाटील, विनोद हिरे, बापू मिस्तरी, दिलीप पाटील, लालाचंद पाटील, राजेंद्र मिस्तरी, अतुल बोरसे, निलेश चौधरी, ईश्वर हिरे, शामकांत हीरे, रावसाहेब पाटील, विरेंद्र देवरे, मोहन चौधरी, राकेश वाघ यांनी लोकसहभागातून ह्या स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. यावेळी जीन परीसरातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.

ग्रामपंचायत चया विरोधात सरपंच व कोणताही लोक प्रतिनिधीनी अजुन भेट दिली नाही. डेगुचे एवढे रुग्ण आढळले असून सरपंच यांनी या एरियात भेट सुद्धा दिली नाही, त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.







