पालकमंत्री यांनी पाळधीत, गिरीश महाजन यांनी जामनेरला केले मतदान
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील विविध मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांनीं मतदान करून त्यांचा मताचा हक्क बजावला आहे. यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे मतदानाचा हक्क बजावला. तर मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर शहरात परिवारासह मतदान केले.
अमळनेर येथे मंत्री अनिल पाटील यांनी, पारोळा येथे उमेदवार अमोल चिमणराव पाटील, डॉ. सतीश पाटील, चाळीसगावात आ. मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक, उन्मेष पाटील, पाचोरा येथे आ. किशोर पाटील, वैशाली सूर्यवंशी, जळगाव शहरात आ. राजूमामा भोळे, जयश्री महाजन, जळगाव ग्रामीण येथे माजी मंत्री गुलाबराव देवकर, दिलीप खोडपे यांचे जामनेर तालुक्यातील नेरी येथे मतदान झाले.
मुक्ताईनगर येथे सहपरिवार आ. चंद्रकांत पाटील व ऍड. रोहिणी खडसे यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी मतदान केले. रावेर येथे आ. शिरीष चौधरी यांचेसह सहपरिवार उमेदवार धनंजय चौधरी, अमोल जावळे, भुसावळ येथे आ. संजय सावकारे, डॉ. मानवतकर यांनी मतदान पूर्ण केले. उमेदवारांनी सर्व नागरिकांना लोकशाहीच्या या महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करीत मतदान करा असे सांगितले आहे.