जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील हॉटेल प्रेसिडेंट येथे ९४ . ३ माय एफ. एम. तर्फे शेतकऱ्यांच्या कष्टाला सलाम म्हणून शेतीत वेगवेगळ्या पद्धती वापरून, आधुनिक तंत्राचा वापर करून प्रयोगशील असलेल्या जिल्ह्यातील ४० शेतकऱ्यांना “फँन्टास्टिक फार्मर अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले.

चोपडा तालुक्यातील वरगव्हाणचे पोलीस पाटील तसेच प्रगतिशील शेतकरी गोरख पाटील यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव, महापौर जयश्री महाजन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
वरगव्हाण ग्रामपंचायत सरपंच, भुषण पाटील, उपसरपंच मिमा बरेला, सदस्य रवी पाटील, जहांगीर तडवी, जावेद तडवी, इंद्रायणी पाटील, यास्मिन तडवी, सायलिबाई पावरा, सपना पावरा, हैदर तडवी, जहाभाज तडवी, महेंद्र पाटील यांनी व ग्रामस्थांनी नानांचे अभिनंदन केले आहे.







