जळगाव ( प्रतिनिधी ) – आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह अन्य सर्व अधिकारांचा वापर करून जिल्ह्यात सुधारित कोरोना निर्बंध लागू करण्यात येत असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले आहेत .
या आदेशानुसार पुढील आदेश जारी होईपर्यंत सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत पाचपेक्षा जास्त नागरिकांना एका ठिकाणी गर्दी करण्यास मनाई राहील. अत्यावश्यक सेवा व्यतिरीक्त रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत मुक्तपणे संचार करण्यास मनाई राहील. कार्यालय प्रमुखांच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही अभ्यांगतांना शासकोय कार्यालयात प्रवेश असणार नाही. कार्यालय प्रमुखांनी नागरिकांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधावा. खाजगी आणि सरकारी कार्यालय प्रमुख यांनी कार्यालयातील कर्मचारी यांचे कामाचे सुसुत्रोकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार कामाचे तास निश्चित करावे. कार्यालय प्रमुख यांनी कार्यालयात धर्मल गन, हँड सॅनिटाईजर उपलब्ध करुन ठेवावे. कार्यालये 24 तास सुरु ठेवावयाचे असल्यास कर्मचा-यांचे शिफ्ट नेमून देण्यात यावेत. तथापि दररोज 50 % पेक्षा जास्त कर्मपचारी संख्या असणार नाही. रात्रीच्या वेळेस शिफ्ट नेमून देण्यात आलेली असल्यास अशा कर्मचा-यांना प्रवास करण्यासाठी ओळखपत्र सोबत बाळणणे अनिवार्य राहील.
ज्या कर्मचा-यांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोनही मात्रा घेतलेल्या आहेत अशा कर्मचा-यांना कार्यालयात काम करता येईल. ज्यांनी दोनही मात्रा घेतलेल्या नाहीत अशा कर्मचा-यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे. लग्न समारंभ 50 लोकांच्या मर्यादेत करता येतील. सामाजिक , धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम केवळ 50 लोकाच्या मर्यादेत करता येतील. इयत्ता 10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांकरीता बोर्डाकडून निश्चित करण्यात आलेले उपक्रम सुरु राहतील. शालेय शिक्षण विभाग, कोशल्य व उद्योजकता विभाग, उच्च तंत्र शिक्षण , वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग व इतर विभागाकडून निश्चित करण्यात आलेले उपक्रम सुरु राहतील. इतर उपक्रम सुरु ठेवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पूर्व परवानगी आवश्यक राहील.
स्विमिंग पूल, स्पा सेंटर,50% क्षमतेसह सुरु राहतील तथापि मास्कचा वापर आवश्यक राहील. जिमच्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी व सेवा घेणारे नागरिक यांनी कोविड लसीकरणाच्या दोनही मात्रा घेतलेल्या असाव्यात केवळ अशाच लोकांना प्रवेश देण्यात यावा.
दररोज रात्री 10. ते सकाळी 7 पावेतो बंद राहील. नागरिकांना तिकीट विक्री करुन मनोरंजनात्मक सेवा दिल्या जातात असे कार्यक्रम व मॉल्स 50% क्षमतेसह सुरु , तथापि व्यवस्थापकाने एकूण क्षमता व उपस्थित अभ्यांगत यांची संख्या बाहेरील नोटीस बोर्डावर प्रसिध्द करणे आवश्यक राहील. संबंधित व्यवस्थापक यांनी कोविड अनुरुप वर्तनाचेपालन करण्याकामी आवश्यकतेनुसार गार्डची नियुक्ती करावी.
खानावळ व तत्सम 50% क्षमतेसह सुरु राहतील, व्यवस्थापकाने एकूण क्षमता व उपस्थित अभ्यांगत यांची संख्या बाहेरील नोटीस बोर्डावर प्रसिध्द
करणे आवश्यक राहील कोविड लसीकरणाच्या दोनही मात्रा घेतलेल्या आहेत अशाच व्यक्तोंना प्रवेश देण्यात यावा .
राज्यात प्रवेश करतांना कोविड ल्साकरणाच्य मात्रा धणे आवश्यक असेल 72 तासापूर्वीचा २1९1२ चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत बाळगणे अनिवार्य राहील. सदरची अट ही विमान, रेल्वे, रस्त्याने वाहतूक करणा-या प्रवासी, वाहन चालक, व इतर सहकारी कर्मचारी यांना देखील लागू राहील. कामगार वाहतूक, ओद्योगिक कारखाने सुरु राहतील मात्र कोबिड लसीकरणाच्या दोनही मात्रा घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा सावर्जनिक वाहतूक नियमित सुरु राहतील. कोविड लसीकरणाच्या दोनही मात्रा घेतलेल्या आहेत अशाच व्यक्तींना प्रवास करता येईल. स्पर्धा परिक्षांकरीता भारत सरकार यांचे नियम लागू राहतील. याकरीता परिक्षेचे प्रवेशपत्र , ओळखपत्र प्रवास करण्यासाठी वैध राहील. राज्य पातळीवर घेण्यात येणा-या परिक्षांसाठीचे प्रवेशपत्र आधीच
निर्गमीत झालेली आहेत किंवा ज्यांच्या तारखा आधीच निश्चित करणेत आलेल्या आहेत त्या अधिसूचनेनुसार पार पाडल्या जातील. अन्य सर्व परिक्षा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजूरी नंतरच पार पाडल्या जातील. अत्यावश्यक सेवा घेण्यासाठी सुट राहील. जे कार्यालये 24 तास सुरु राहतात त्या कार्यालयातील वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करणारे कर्मचारी यांना अत्यावश्य सेवेमध्ये समजण्यात यावे
रेस्टांरट, शॉप्स, हॉटेल्स व ई कॉमर्स सुविधा पुरविणा-या आस्थापना, घरपोच सुविधा पुरविणा-या आस्थापना या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी यांनी कोविड लसीकरणाच्या दोनही मात्रा घेणे आवश्यक राहोल. अशा ठिकाणी निर्बंधांचे पालन न केल्याचे आढळुन आल्यास अशा आस्थापना बंद करण्यात येतील. कर्मचा-यांची वेळोवेळी चाचणो करुन घेणे आवश्यक राहील.
शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि संसाधने यांची आवश्यकतेनुसार सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवसापन प्राधिकरण यांना राहतील. निर्बंधांचे पालन होत आहे किंवा नाही यासाठी नियंत्रणाची जबाबदारी संयुक्तिकरीत्या पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची राहील.
अत्यावश्यक सेवांमध्ये खालील बाबींचा समावेश राहील :- हॉस्पिटल, डायग्नोस्टीक सेंटर्स, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय बिमा कार्यालये, फॉर्मसी, औषधी कंपन्या, इतर वैद्यकोय व आरोग्य विषयक सुविधा पुरिवणारे व निर्मिती करणारे घटक , वितरण व्यवस्था , वितरक , वाहतूक व्यवस्था, सीकरणाचे उत्पादन ब वितरण व्यवस्था, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरण व त्यासंबंधीत कच्चेमाल पुरविणारे इतर घटक व आस्थापना. पशु वैद्यकोय सेबा , प्राणी व्यवस्थापन करणा-या संस्था व पशु खाद्य दुकाने किराणा, भाजीपाला दुकाने, फळे विक्रेते, दुग्धालय, बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारचे खाद्यन्न पुरवठा करणारे, कच्चा माल तयार करणारे व तयार केलेले अन्न पुरवठा करणारे दुकाने , कोल्ड स्टोरेज ब वेअर हाऊसिंग सेवा , सार्वजनिक वाहतुक व्यवस्था :- विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटो व बसेस . स्थानिक प्राधिकरण यांच्या परवानगीने सुरु असलेले मान्सून पूर्व करावयाची कामे दुरसंचार सेवा व त्यांचेशी संबंधित दुरुस्ती व देखभाल करणारे आस्थापना व संस्था , मालवाहतूक सेवा , पाणीपुरवठा संबंधित सेवा , कृषी सेवेशी संबंधित घटक, बी- बियाणे , शेती अवजारे, खते, उपकरणे दुरुस्ती व देखभाल करणारे घटक , पेट्रोल पंप व पेट्रोलिअमशी सेवेशी संबंधित घटक , शासकीय व खाजगी सुरक्षा रक्षक सेवा
विद्युत व गॅस पुरवठा करणारे घटक, एटीएम सेवा , पोस्टल सेवा , अत्यावश्यक सेवेकरीता कच्चा माल तयार करणारे व पॅकींग करणारे घटक
पावसाळ्यात आवश्यक असलेल्या सेवा पुरविणारे घटक केंद्रशासन, राज्य शासन , निमशासकीय कार्यालये व स्थानिक प्रशासनाशी निगडीत कार्यालये
को-ऑपरेटीव्ह, पीएसयु व खाजगी बँक , अत्यावश्यक सेवा पुरविणारे कंपन्यांची खाजगी कार्यालये , विमा व मेडीक्लेम कंपन्या , स्थानिक प्राधिकरण यांच्याकडून निश्चित केल्या जाणा-या अत्यावश्यक सेवा