सर्वाधिक पाऊस भुसावळ, जळगावमध्ये !
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यात अद्यापही पेरण्या रखडलेल्या आहेत. जून महिन्यात १३ दिवसांमध्ये ८८.६ मिलिमीटर तर ७१.६ टक्के मि.मी पावसाची नोंद झालेली आहे. तर आज दि. २६ रोजी ९.८ मिलिमीटर पावसाची नोंद जिल्ह्यात झालेली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यामधील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अंमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, धरणगाव बोदवड मध्ये जून महिन्याच्या २६ दिवसांच्या कालावधीमध्ये १३ दिवस पावसाने हजेरी लावलेली आहे. सर्वाधिक पाऊस भुसावळ १३ दिवस, जळगाव १२ दिवस, पारोळा धरणगाव या ठिकाणी १० दिवस, बोदवड, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, एरंडोल या ठिकाणी ९ दिवस चोपडा भडगाव याठिकाणी ८ दिवस, यावल ७ दिवस, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर या ठिकाणी ६ दिवस पावसाची नोंद झालेली आहे.