शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दराप्रमाणे नाफेड अंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ साठी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरी खरेदीला सुरुवात झाली आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, कासोदा, म्हसावद जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव आणि चाळिसगाव या तालुक्यांमध्ये एकूण १६ हरभरा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तर या १६ तालुक्यासह पाळधी येथे ज्वारी, मका आणि बाजरी खरेदी केंद्र कार्यरत आहे.
शेतकऱ्यांनी हरभरा, ज्वारी, मका आणि बाजरीची नोंदणी आणि खरेदीचा लाभ घ्यावा व ऑनलाइन नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक आणि ऑनलाइन पोकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा आणि ८ अ कागदपत्रे घेऊन जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय संचालक मंत्री संजय सावकारे, उपाध्याक्ष रोहित दिलीपराव निकम, जिल्हा पणन अधिकारी एस.एस.मेने यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
हरभरा
हमीभाव : ५६५० रुपये प्रति क्विंटल
शेतकरी नोंदणी कालावधी: दि. २७ मार्च ते २५ एप्रिल
खरेदी कालावधी: १ एप्रिल ते २९ जून २०२५
ज्वारी, मका आणि बाजरी
हमीभाव:
ज्वारी: ३३७१ रुपये प्रति क्विंटल
मका: २२२५ रुपये प्रति क्विंटल
बाजरी: २६२५ रुपये प्रति क्विंटल
शेतकरी नोंदणी कालावधी: २ एप्रिल ते ३० एप्रिल
खरेदी कालावधी : १ मे ते ३० जून २०२५