जळगाव (प्रतिनिधी) : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा जळगाव अंतर्गत अटल भूजल योजनेमध्ये डी एल आय अभिसरणांतर्गत सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी माहे-एप्रिल ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अभिसरणांतर्गत झालेल्या मागणी व पुरवठा आधारित उपाययोजनांचे विविध संलग्न विभागांकडून माहिती गोळा करण्याकामी दि. २० ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत डीएल आय #३ अभिसरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.
सदर सप्ताहबाबत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अटल भूजल योजना जिल्हा नियोजन व समन्वय समिती, जळगांव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, जळगांव येथे २४ सप्टेंबर रोजी ३ वा. पुरवठा व मागणी आधारित उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर बैठक घेण्यात आली. त्यानुसार दर दिवशी राबवायच्या उपक्रमाचे वेळापत्रक ठरले.
पहिला दिवस – सप्ताहाचे उदघाटन व संलग्न विभागांची जिल्हास्तरावर बैठक, दुसरा दिवस – संलग्न विभागांना भेट देणे, तिसरा दिवस संलग्न विभागाना भेट देणे, चौथा दिवस – पुरवठा व मागणी आधारित उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हास्तरावर बैठक घेणे, पाचवा दिवस – पुरवठा व मागणी आधारित कामांचा माहिती तयार करुन सादर करायचे आहे, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.