जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा कोवीड रुग्णालयाने आज दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दिवसभरात एक नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळला असून आधीचा दुसरा रुग्ण बरा झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७४३ बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी १ लाख ४० हजार १५९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. त्याचप्रमाणे २ हजार ५७५ रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ९ रुग्ण ॲक्टिव्ह असून आज एक रुग्ण जळगाव शहरात आढळला आहे तर एक रुग्ण बरा झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.







