जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त कोरोना अहवालातून आज जिल्ह्यात दिवसभरात १ बाधित रूग्ण आढळून आला , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.
जिल्हा रूग्णालयाकडून आज प्राप्त कोरोना अहवालात ग्रामीण भागातून एक बाधित रूग्ण आढळला आहे. सध्या जिल्ह्यात १५ ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ७७६ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४० हजार १८४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली.