जळगाव ( प्रतिनिधी ) — जिल्ह्यात आज दिवसभरात फक्त १ कोरोना रूग्ण आढळून आला ३ रूग्ण बरे होवून घरी परतले , अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या अहवालात आज चाळीसगाव तालुक्यातून एक रूग्ण आढळून आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७३४ रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४० हजार १४९ रूग्ण बरे झाले . सध्या १० रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आतापर्यंत २ हजार २७५ रूग्णांचा उपचारादरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली