चाळीसगाव, कासोदा, जामनेर, भडगाव येथे पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) :- राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातदेखील मंगळवारीपासून नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी एकाच दिवसात १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केली आहे. रोकडबाबत चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पोलिसांनी चाळीसगाव ग्रामिण पो.स्टे. हददीतील जामडी येथे लावण्यात आलेल्या एसएसटी पॉइंटवर दुपारी १ वाजेच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान नागदकडुन चाळीसगावकडे जात असलेल्या महिंद्रा वाहनाची तपासणी केली. या वाहनामध्ये ७ लाख २२ हजार ५०० रोख रक्कम मिळून आली. पोलिसांनी रक्कम जप्त केली असून कोषागारात जमा केली आहे. कासोदा पोलीस स्टेशन हददीतील फरकांडे फाट्याजवळ ऑल आउट स्किम नाकाबंदी करीत असताना एरंडोलकडून येणारी पांढऱ्या रंगाची क्रेटा ही सांयकाळी ५.४५ वाजेच्या दरम्यान थांबवून तपासणी केली असता ५०० व १०० दराच्या नोटा मिळून आल्या. पोलिसांनी रक्कम तपासली असता १ कोटी ४५ लाख रुपये असल्याचे समजते. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
भडगाव पोलीस स्टेशन हददीतील पारोळा चौफुली भडगाव येथे नाकाबंदी दरम्यान वाहनाची तपासणी करताना १ लाख ४९ हजार रुपये रोख मिळुन आली असून सदर रक्कम पुढील कारवाईसाठी पाचोरा भडगाव विधानसभा मतदार संघातील एफएसटी पथक क्र.३ यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. जामनेर पोलीस स्टेशन हदीतील नेरी येथे नाकाबंदी दरम्यान एक इसमाच्या ताब्यातुन ४ लाख ४६ हजार १२० रुपये मिळून आल्याने ते जप्त करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी प्रशासनाच्या सहकार्याने एकाच दिवसात १ कोटी ९० लाख ६५ हजार ४१२ रुपयांची रोकड जप्त केली आहे.