जळगाव (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आज जिल्हास्तरीय ‘ आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र शासनातर्फे आजादी का अमृत महोत्सव उपक्रम राबविण्याची सूचना प्राप्त आहे. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छता ही सेवा हे अभियान जि प मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दि.रा.लोखंडे यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाभरात राबविण्यात येत आहे.याचे जिल्हास्तरीय उद्घाटन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जुनी पंचायत समिती , धरणगाव येथे करण्यात आले.
यावेळी सभापती प्रेमराज पाटील, उपसभापती शारदा पाटील, जि. प. सदस्य गोपाळ चौधरी, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, तहसीलदार नितिन देवरे, गटविकास अधिकारी श्रीमती स्नेहा कुडचे, क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे, माहिती शिक्षण व संवाद तज्ञ निलेश रायपूरकर, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास, मूल्यमापन तज्ञ भगवान पाटील, गटसमन्वयक सपना पाटील, समूह समन्वयक अमित तडवी आदी उपस्थित होते.यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वच्छतेचे आणि देशसेवेचे महत्त्व पटवून दिले. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२१ या लोगोचे अनावरण करून जिल्हास्तरीय औपचारिक सुरुवात केली.








