प्रकरण दाबण्यासाठी डॉक्टरांकडून एक लाखांचे आमिष ; दबाव आणण्याचा प्रयत्न
जळगाव (प्रतिनिधी ) ;- डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना दिलेल्या तक्रार पत्रात दिला असून रुग्णाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नातेवाईकांना तातडीने मृत्यू दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ दिपा भोळे यांनी रुग्णाला न्यूमेनियाने झाला असल्याचे पोलिसांना कळविले असून रुग्नांच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला असल्याने जिल्हा रुग्णालय आवारात गर्दी निर्माण झाली होती. प्रकरण दाबण्यासाठी डॉक्टरांकडून एक लाखांचे आमिष दाखवून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे मयताच्या भावांनी आरोप केला आहे.
तक्रारी पत्रात म्हटले आहे कि, शंकर मधुकर निकम वय ३२ रा. गेंदालाल मिल , शिवाजी नगर याला १० रोजी सकाळी ११ वाजता रक्तदाब कमी झाल्याने उपचारासाठी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आयसीयू विभागात दाखल केले होते. यात शंकर यांची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला होता. सलाईन संपल्यानंतर डॉ. बिलाल खान आणि डॉ. शीतल यांनी रुग्णाला आईस्क्रीम खाऊ घालण्याचे सांगितल्याने रुग्णाला आईस्क्रीम दिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला . डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे व चुकीच्या उपायामुळे मृत्यू झाला असून आम्हाला डॉ. बिलाल खान यांनी कागदपत्रे फेडण्यास सांगून प्रकरण दाबण्यासाठी दबाव आंत असल्याचा आरोप मयताचे भाऊ दीपक निकम आणि संदीप निकम यांनी केला असून मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मयत रुग्नाचा न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले . शहर पोलीस स्टेशनमध्ये यावरुन सी आर पी सी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे . प्राथमिक पुढील तपास पो.हे.काँ. राजेंद्र परदेशी, पो.का. जयेंद्रसिंग पाटील करीत आहेत.