कोरोना लसीकरणाचा घेतला आढावा

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी दि. ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाहणी केली. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी आढावा घेत १०० टक्के लसीकरण उद्दिष्ट ठेवा असे जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगितले.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुक्रवारी जळगाव तालुक्यात आरोग्य केंद्रांवर दौरे केले. दौऱ्याच्या शेवटी शिरसोली प्र.न.येथील आरोग्य उपकेंद्रावर त्यांनी उपस्थिती दिली. कोरोना महामारीला थांबवण्यासाठी गावातील लसीकरण किती राहिले याची माहिती त्यांनी घेतली. लसीकरणाविषयी प्रचार करावा असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. निलेश अग्रवाल यांनी, लसीकरणाविषयी प्रतिसाद चांगला असल्याचे सांगून ग्रामस्थांना लसीविषयी असलेले समज-गैरसमज दूर करीत असल्याचे सांगितले. आरोग्य केंद्राचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
यावेळी सरपंच हिलाल भिल, उप सरपंच पती मिठाराम पाटील, ग्रा.पं. सदस्य श्रावण ताडे, रामकृष्ण काटोले, विनोद बारी, गौतम खैरे, शशिकांत अस्वार, मुदस्सर पिंजारी यांचेसह शेनफडू पाटील, भगवान बोबडे, सुनील पाटील, गोकुळ ताडे, डॉ.निलेश अग्रवाल, डॉ. तेजस्विनी देशमुख, आरोग्य सेवक निलेश चौधरी, आरोग्य सेवक अनिल महाजन, आरोग्य सेविका निर्मला सपकाळे व सर्व आशा कर्मचारी उपस्थित होते.







